Marathwada Election | मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच | NDTV
Tug-of-war between Shiv Sena and BJP over the Graduates' constituency in Marathwada.
विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा सुरुवातीपासून भाजपचा पारंपारिक गड राहिला आहे, त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. विशेष म्हणजे सद्या या मतदारसंघात विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सतीश चव्हाण आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चव्हाण यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली होती, तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून थेट दावा केला जात असल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे.