आज सर्वपित्री अमावास्या आणि उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत असल्यामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. मात्र, या वर्षी पावसामुळे झेंडूच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने फुलांचे भाव वाढले आहेत. सध्या किरकोळ बाजारात झेंडू १६० ते २०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी घेतलेला हा आढावा नक्की पहा.