छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली. या सभेला महायुतीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी सतीश चव्हाण यांनी गेल्या १८ वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडत पुन्हा एकदा पहिल्या पसंतीचं मतदान देण्याचं आवाहन केलं. तर मंत्री अतुल सावे, बाबासाहेब पाटील आणि संजय शिरसाट यांनीही चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत महायुतीची एकजूट दाखवून दिली.