Mayank Lohar Case| लोकलमध्ये प्रवाशाची हत्या, आरोपी रोशन सुवर्णाला अटक; आरोपीला नेमकं कसं पकडलं?

लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादात एकाचा चाकू भोसकून खून करण्यात आलाय. मयांक लोहार असं हत्या झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. जखमी झालेल्या मयांकला रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात काल रात्री ही घटना घडलीय. 22 वर्षीय मयांक हा विरार इथला रहिवासी आहे. मयांकच्या मृत्यूमुळे संताप पसरला असून तो राहात असलेल्या भागात शोककळा पसरलीय. हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाला पोलिसांनी कुर्ल्यातून अटक केलीय.

संबंधित व्हिडीओ