रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेच्या मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे.नागरिकांनी रेल्वेचं वेळापत्रक बघून घरीबाहेर निघण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.