नाशिकमध्ये उद्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा मेगा इव्हेट पार पडणार आहे.कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय.. नाशिकच्या ईतर मंत्र्यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून सकाळी 9 वाजता मखमलाबाद परिसरात हैदराबादहुन आणलेल्या झाडांचा वृक्षारोपण सोहळा पार पडेल. यानंतर शहरात टप्प्याटप्प्याने 15 हजार वृक्ष लावली जाणार..