राज्यातल्या रोजगार क्षेत्रांमध्ये परप्रांतियांची मक्तेदारी दिसून येतेय. महाराष्ट्रातून वर्षाकाठी सव्वा लाख कोटी रुपये परप्रांतात जात आहेत. सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. दैनंदिन रोजगाराच्या 50 लाख ते एक कोटी इतक्या संधी राज्यात उपलब्ध आहेत. मात्र या रोजगार संधीचा लाभ घेण्याची मनोवृत्ती मराठी तरुणाईमध्ये दिसत नसल्याचं या अहवालातल्या आकडेवारीवरुन समोर आलंय. याच्या उलट अवस्था परप्रांतिय तरुणांची आहे. मिळेल तो आणि पडेल ते काम करत पैसे गाठीला मारण्याची मनोवृत्ती परप्रांतियांमध्ये दिसते.