मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान पत्रकारांसोबत झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ शिवसेनेने भाजप नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान भाजप नगरसेवकांच्या फोटोंना चपला मारून निषेध व्यक्त करण्यात आला. 16 ऑक्टोबरच्या पालिकेच्या महासभेदरम्यान काही नागरिकांना आणि पत्रकारांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पत्रकारांच्यावतीने पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचा आरोप करत शिवसेनेने आंदोलन केलं.
Incident of mistreatment of journalists during a Mira-Bhayandar Municipal Corporation general body meeting; Shiv Sena and BJP corporators face a strong backlash.