Mira Road| धार्मिक कारणातून 2 सुरक्षारक्षकांवर हल्ला; आरोपीने कलमा पठण करण्यास सांगितलं; आरोपीला अटक

मीरारोडमध्ये एका सोसायटीच्या 2 सुरक्षारक्षांवर चाकूहल्ला करण्यात आलाय, धार्मिक कारणातून हा प्रकार झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय.मीरारोडच्या नयानगर परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय,आरोपी जैब जुबेर अंसारीने सुरक्षा रक्षकांना त्यांचा धर्म विचारला आणि कलमा पठण करण्यास सांगितलं आणि यावरूनच वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे, मीरा-भाईंदरमधील नयानगरमधील वोकहार्ट रुग्णालयाच्या मागे एका निर्माणाधीन इमारतीत हा प्रकार घडलाय.सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रोतो सेन यांच्यावर हा हल्ला झालाय, दोघांची प्रकृती सध्या आता स्थिर असल्याची माहिती आहे.ठाणे एटीएसकडून या प्रकरणाचा हिंदू-मुस्लिम अँगलने तपास सुरू आहे

संबंधित व्हिडीओ