मुक्ताईनगरच्या जागेसाठी MLA Chandrakant Patil आग्रही, पाटलांचे कार्यकर्ते रक्षा खडसेंच्या विरोधात

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जागेवर दावा ठोकला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असताना चंद्रकांत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एवढंच नाही तर भाजपने त्याग करून ही जागा शिवसेना शिंदे गटाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एका व्यक्तीकडे किती पदं असावीत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी रक्षा खडसे यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.

संबंधित व्हिडीओ