राज्यातील आमदारांनी लाज सोडली आहे, असा घणाघात माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय.धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृह रोकडप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे पुन्हा आक्रमक झालेत. अधिवेशनात कोणत्याही आमदाराने रोकड प्रकरणी प्रश्न उपस्थित न केल्याने त्यांनी निशाणा साधलाय.. त्याचबरोबर हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव असल्याचे म्हणत त्यांनी आरोप केलेत.