महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे... मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी ८ वाजताच्या सुमारास रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेणार आहेत... यानंतर रायगडच्या पायथ्याशी एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये राज ठाकरे स्वतः पक्षाच्या सदस्यत्वाचा अर्ज भरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात करणार आहेत... उद्यापासून राज्यव्यापी सदस्य नोंदणी सुरु होणार आहे...