इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसोर्टमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.पालिका निवडणुकीच्या मनसे काय तयारी करणार?.राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय संबोधणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.दुसरीकडे काल मराठी विषयाबाबत पार पडलेला विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता..नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यानची राजकीय परिस्थिती बघूनच युतीचा निर्णय मनसेकडून घेतला जाणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांची दिलीय.. एकंदरीत मनसेने सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.शिबिराच्या निमित्ताने राज ठाकरे 3 दिवसांसाठी इगतपुरीत आहेत.