जून महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेवेन शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. सहा वर्षानंतर अशा हाय प्रोफाइल व्यासपीठावर त्यांची ही पहिलीच अनुपस्थिती असल्याचं म्हटलं जातंय. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध यासोबतच सुरक्षेची चिंता आणि भारताला अद्यापपर्यंत अधिकृत निमंत्रण न आल्याचं कारण यामागे असल्याचं सांगितलं जातंय.