आणखी जीव जातील, ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच; Donald Trump यांनी वाढवली जगाची चिंता

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधातयुद्ध छेडले आहे. अयातुल्लाह खामनेई यांच्या मृत्यूनंतर युद्धाचा भडका उडाला आहे. इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात असून, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची चिंता वाढवणारे विधान करत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिले आहेत. इराणवर हल्ले सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "जोपर्यंत आमचे ध्येय पूर्णपणे साध्य होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार आहेत." एका व्हिडीओमध्ये संदेशामध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "आमचे लष्करी अभियान पूर्ण ताकदीने सुरू आहे. दुर्दैवाने याचीही शक्यता आहे की आणखी काही अमेरिकेच्या लोकांचे जीव जातील. युद्धात असेच होत असते...असे म्हणत ट्रम्प यांनी संघर्ष आणखी वाढण्याचे संकेत दिले आहेत.

संबंधित व्हिडीओ