राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 हून अधिक आमदारांनी काल उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित करण्यात आल्यात.डीजीसीएच्या अहवालातील त्रुटी तसेच अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप का नेमण्यात आलेली नाही याबाबत आमदारांकडून सवाल उपस्थित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. सर्वसामान्यांच्या मनातील शंकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याची सुनेत्रा पवार यांना विनंती करण्यात आली आहे.