पुण्यात MPSC चे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी मध्यरात्री अचानक आंदोलन सुरु केल्यामुळे पोलिसांचीही चांगलीच धांदल उडाली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रोहित पवार आणि बच्चू कडू यांनीही सरकारला इशारा दिलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतलेत... विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? आणि आंदोलन पुन्हा कसं तापलंय? पाहूया