सरकारी नोकरभरतीची संथ प्रक्रिया आता बदलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) नोकरभरतीची प्रक्रिया जलद करून पुढील वर्षात मोठ्या प्रमाणावर महाभरती केली जाईल. अनुकंपा तत्त्वावरील आणि लिपिक श्रेणीतील १०,३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरीत करताना ते बोलत होते. बेरोजगारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.