पुण्यात MPSC चा विद्यार्थी प्रथमेश देशमुखनं संपवलं जीवन, घटनास्थळावरुन NDTV मराठीचा Ground Report

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्यांची दुर्दैवी घटना समोर आली आहे.प्रथमेश दिलीप देशमुख असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील खासापुरी, येथील रहिवासी होता. प्रथमेश पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते आणि आर्थिक अडचणींमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुण्यातील नारायण पेठ पोलीस चौकीमध्ये नोंद करण्यात आली असून, घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील वाढता आर्थिक आणि मानसिक ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. MPSC student Prathamesh Deshmukh death in Pune NDTV Marathi's ground report from the scene.

संबंधित व्हिडीओ