Mumbai| कुर्लामध्ये 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, खेळता खेळता लिफ्टच्या शाफ्टमध्ये कोसळला

मुंबईतील कुर्ला ,नेहरू नगर येथील शमीम टॉवरमध्ये सोमवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. मित्रांसोबत खेळत असताना लिफ्टच्या बाहेरील दरवाजाला टेकलेल्या 12 वर्षीय मुलाचा तोल जाऊन तो थेट लिफ्टच्या डक्ट मध्ये कोसळला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून, लिफ्टच्या देखभालीत किंवा व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसानी सांगितले.

संबंधित व्हिडीओ