Mumbai-Ahmedabad Highway Traffic | शिंदेंचा आदेश फडणवीसांनी फिरवला | NDTV मराठी

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसा अवजड वाहतुकीला मनाई करण्याचा आदेश दिला होता. मात्र, यामुळे मालवाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाल्याने उद्योग जगतातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत शिंदे यांचा निर्णय फिरवला. आता सरसकट बंदीऐवजी अवजड वाहतुकीसाठी विशिष्ट वेळा निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

संबंधित व्हिडीओ