Mumbai Air Pollution | मुंबईची हवा आणखी बिघडली, सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स 203 वर | NDTV Marathi
Mumbai's air quality has worsened further, with the average Air Quality Index at 203.
मुंबईची हवा आज आणखी बिघडली.. आधीच मुंबईकर प्रचंड उकाड्याने हैराण आहेत. त्यात आता प्रदूषणही गंभीर पातळीवर गेल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली आहेत. मुंबईतल्या एअर क्वालिटी इंडेक्सने 203 चा टप्पा गाठलाय. मुंबई शहर तसंच उपनगरमध्येही दिवसभर धुरक्याची चादर होती.. वांद्रे वरळी सी लिंक आणि अटल सेतूही या धुरकट पडद्याआड गायब झाले होते. इमारती, उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामं पुन्हा वेगाने सुरु झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ हवेत मिसळतेय.