मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 चा पुनर्विकास होणार आहे, यामुळे इथली विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासंदर्भात हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांनी काही आदेश दिले आहेत. या आदेशानुसार देशांतर्गत विमान कंपन्या आणि विमानतळ चालकांना आराखडा सादर करण्यास सांगितलंय. यासंदर्भातील पुढील बैठक 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर अंतिम आराखड्यासंदर्भात 20 ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे