मुंबई ते बंगळुरू दरम्यान धावणारी देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन सुरु होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी तिचं उद्घाटन केलं जाईल. त्यानंतर ३ नोव्हेंबरपासून नियमित प्रवाशांच्या सेवेसाठी ही ट्रेन सुरू होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बंगळुरू येथील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल अशी ही ट्रेन धावणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यामुळे या दोन शहरांमधील प्रवास साधारण १६ तासांत होणार आहे. इतर गाड्यांच्या तुलनेत ७ ते ८ तासांची बचत प्रवासात होऊ शकते.