मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका, CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपयांची वाढ;CNG पंपावरुन घेतलेला आढावा

मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेड अर्थात एमजीएलने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ केली असून, मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर आता 90 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या नैसर्गिक वायूच्या किमती आणि देशांतर्गत गॅस पुरवठ्यात झालेली घट यामुळे गॅस खरेदीचा खर्च वाढल्याचं एमजीएलने स्पष्ट केलं आहे. या दरवाढीचा परिणाम सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या खर्चावर होणार आहे.

संबंधित व्हिडीओ