मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. शाळेवर झाड कोसळले, उघड्या मॅनहोलमध्ये नागरिकाचा मृत्यू झाला, अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली गेला... अशा अनेक घटनांनी शहर हादरले.मात्र या सर्व नकारात्मक घडामोडींमध्ये एक आशादायक चित्रही समोर आले आहे.कधीकाळी मुसळधार पावसाचे नाव घेताच पाण्याखाली जाणारा हिंदमाता परिसर यंदा 500 मिमीहून अधिक पाऊस पडूनही मोठ्या जलभरावापासून सुरक्षित राहिला. एकेकाळी अनेक दिवस पाण्यात बुडणारा हा परिसर यावेळी नागरिकांसाठी दिलासादायक ठरला. यामागे आहे बीएमसीचा हिंदमाता 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्प जो गेम चेंजर प्रकल्प ठरला आहे.. स्थानिक दुकानदारांनी मुंबई महापालिकेचा आभार मानलेले आहे, त्याचबरोबर फ्लड मिटिकेशन प्रकल्पामुळे यावर्षी हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचले नाहीये...याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी..