#Mumbai #MumbaiLocal #LocalTrain #CSMT मुंबईच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. लोकल ट्रेनच्या धडकेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक अचानक खोळंबल्यामुळे स्थानकांवर तुडुंब गर्दी झाली होती. रेल्वे वाहतूक लवकर सुरू होत नाही, हे पाहून अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे झालेल्या गर्दीमुळेच ही अपघाताची घटना घडल्याचा गंभीर आरोप प्रवासी करत आहेत.