मुंबई महापालिकेवर तब्बल ४४ वर्षांनी आज भाजपाचा दुसरा महापौर विराजमान होणार आहे.महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्यावतीने कोणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट आहे.भाजपाच्या रितू तावडे या महापौर पदाच्या, तर शिंदेसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत.महापौर निवडीनंतर तब्बल १ हजार ४३४ दिवस महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालक मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.