मुंबई मनपाच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी मान्सून पूर्व तयारीची बैठक घेतली.. IMD, MMRDA, BPT म्हाडा अनेक यंत्रणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाण्याचा निचरा करणारे पम्प कुठे सुरु आहे कुठं बंद आहे याचा अंदाज घेण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल ऍप्पच्या माध्यमातून लक्ष ठेवणार असल्याचं आयुक्त भिडे यांनी सांगितलं.. नालेसफाई चांगल्या गतीने सुरु असल्याचा दावा आयुक्तांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केला.. ज्या वस्तीला धोका आहे अशा ठिकाणी 90 हुन अधिक ठिकाणी म्हाडाच्या वतीने संरक्षण भिंती बांधणे सुरु असल्याचंही त्यांनी नमूद केलं..