महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली... मात्र या बैठकीला अनेक महत्वाच्या बड्या नेत्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.. या बैठकीला महाविकास आघाडीच्या 60 आमदारांपैकी फक्त 37 आमदार हजर होते.काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे बडे नेते गैरहजर होते.. तर शरद पवार गटाचे जयंत पाटील, रोहित पवार, अभिजीत पाटील, संदीप क्षीरसागर गैरहजर होते.. शरद पवार देखील प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नसल्याची माहिती मिळतीय.दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मविआच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केलीय.अधिवेशनात महाविकास आघाडी एकत्र दिसत नाही अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केली..तर यापुढे जेव्हा सभा होतील त्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते सभेला उपस्थितीत असतील, असंही बैठकीत सांगण्यात आलं.