Mumbai News| सहकार चळवळीचे मुखपत्र सहकारी महाराष्ट्रचे प्रकाशन, Pankaj Bhoyar यांच्या हस्ते प्रकाशित

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा 107 आणि सहकारी महाराष्ट्राचा 67 वर्षाचा वारसा असलेले सहकार चळवळीचे मुखपत्र सहकारी महाराष्ट्राचे आज सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या शुभहस्ते मुंबई बँकेच्या सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश हावरे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानद सचिव रामदास मोरे, संचालक व नगरसेवक प्रकाश दरेकर, नंदकुमार काटकर, विष्णू घुमरे, जिजाबा पवार, विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, जयश्री पांचाळ, विठ्ठलराव भोसले, कविता देशमुख, आनंदराव गोळे, नितीन बनकर, अनिल गजरे यांसह मोठ्या प्रमाणावर सहकारातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित व्हिडीओ