दिल्लीतील स्फोटामुळे मुंबईच्या सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलीस, एटीएस आणि फोर्स वन पथके विमानतळ, रेल्वे स्थानके आणि संवेदनशील आस्थापनांवर तैनात करण्यात आली आहेत. कोणत्याही अनुचित घटनेला टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. मुंबईकरांनी सतर्क राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.