दिवाळीच्या तोंडावर मुंबई आणि ठाणेकरांना पावसाच्या सरींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने (IMD) या भागासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, त्यानुसार हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील हवामान बदलाचा आणि सद्यस्थितीचा आढावा जुई जाधव यांच्या रिपोर्टमधून.