#maharashtrarain #mumbairains #mumbailocal #ndtvmarathi मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसत आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. NDTV मराठीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.