मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परतीच्या पावसानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत धुराचे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण पसरले आहे. अवघ्या एका आठवड्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या जागतिक यादीत मुंबईनं थेट तिसरं स्थान गाठलं आहे. जगातील 122 मुख्य शहरांच्या हवा गुणवत्तेच्या सर्वेक्षणात मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल 166 वर नोंदवला गेला आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय..