मुंबईकरांना महागाईचा झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ; नवा दर ९१.५० रुपये प्रतिकिलो. - मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने (MGL) घेतला आहे. या दरवाढीनंतर सीएनजीचा नवा दर ९१.५० रुपये प्रतिकिलो होणार आहे.