मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरलीय. पुणे स्टेशनच्या जवळ एक डबा रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय. अपघाताचं स्वरूप किरकोळ असल्याने प्रवाशांना कोणतीही दुखापत नाही, तसंच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जाताना ही घटना घडलीय. संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय.