उन्हाळ्याच्या सुरुवातीला मुंबईकरांना पाणीपुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे...वांद्रे पश्चिम आणि खार परिसरात उद्या तब्बल १४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे....काही भागांत पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे....पाली हिल जलाशयाच्या ९०० मि.मी. आवक जलवाहिनीवर गळती आढळून आली आहे....दुरुस्तीमुळे एच-पश्चिम विभागातील मोठ्या परिसरावर पाणी पुरवठ्याचा परिणाम होणार आहे....