दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे मुंबई आणि परिसरातील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ झाली आहे. मुंबईचा AQI 187 वर पोहोचल्याने मुंबई हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) निर्देशांक 334 अंकांवर गेला आहे. दिल्लीतही फटाक्यांनंतर 38 पैकी 36 मॉनिटरिंग स्टेशनने 'रेड झोन'मध्ये प्रदूषण नोंदवले आहे.