Mumbaicha Rajaचं विसर्जन शुक्रवारीच,परवानगी मिळाली, बार्जवरून पहिल्यांदाच मुंबईच्या राजाचं विसर्जन

मुंबईच्या राजाचं विसर्जन उद्याच होणार आहे.. उद्याच्या विसर्जनाबाबत अखेर सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती समोर आलीय... मुंबईच्या राजाच्या मंडळाची आणि संबंधित यंत्रणांची बैठक सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात आहे.. यंदा प्रथमच 22 फुटी भव्य मुंबईच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीवरून अत्याधुनिक बार्जच्या माध्यमातून खोल समुद्रात करण्यात येणार आहे.. यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या राजाच्या विसर्जनाबाबतचा संभ्रम दूर झाल्याचं चित्र आहे.

संबंधित व्हिडीओ