ओला, उबरच्या संपामुळे मुंबईकरांची प्रवासकोंडी होताना दिसतेय.विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक संपावर आहेत. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.ओला, उबर, रॅपिडोचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करा अशी मागणी चालकांनी केलीये.रिक्षा आणि कॅब परमीटवर मर्यादा आणा अशीही मागणी करण्यात आली.या संपामुळे मुंबई विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतायत. शिवाय ओला-उबरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचेही मोठे हाल होतायत...