8 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीत आता युती आघाडीच्या गणितानंतर आता राज्यभरात नाराजी आणि बंडखोरीला ऊत आला आहे.. नागपुरात नाराज उमेदवारांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरलं आणि आयारामांना संधी देत असाल तर कार्यकर्त्यांचं काय असा थेट जाब विचारला.. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा आशिष माने यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय, मुंबईच्या चांदिवलीतून ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठीच अजित पवार गटात प्रवेश केल्याची चर्चा आहे.. दुसरीकडे वरळीत ठाकरे गटात सुद्धा नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे.. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातच हे नाराजीनाट्य पाहायला मिळात आहे.. वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असल्याने शाखाप्रमुख सुर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय. तर जळगाव महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या आणि इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाठ यांना उमेदवार न मिळाल्याने अक्षरशः ढसाढस रडल्यात, अशीच स्थितीत मुंबईत मनसेमध्ये आहे, उमेदवारी न मिळाल्याने दादरमधील स्नेहल जगताप यांनी मनसेचा राजीनामा दिलाय.. थोडक्यात काय तर युती आणि आघाडीत अनेक ठिकाणी युतीत बेकी आणि आघाडीत बिघाडी असल्याचं स्पष्ट झालं आहे..