महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत, महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे. पण 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली असल्याचे शिवसेना खासदार ,संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली..तर दुसरीकडे एकत्र बैठक घेऊन भूमिका घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देतायत.