नागपूर पोलिसांनी बार आणि वाईन शॉपमध्ये चोऱ्या करणाऱ्या 'राजा खान' नावाच्या आरोपीला अटक केली आहे. चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. दारूच्या व्यसनामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याने दारू विकणाऱ्यांबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला होता. याच रागातून बदला घेण्यासाठी त्याने आठहून अधिक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला पकडले असून, पुढील तपास सुरू आहे.