नागपूरच्या महाल परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी 12 ते 15 गाड्यांची तोडफोड करण्याच आली आहेत.आपल्या एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली आणि त्यावरून काही तरुणांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.याच रागातून तरुणांच्या एका टोळक्याने काल रात्री गाडीखाना परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीचा इन्स्टा मित्राच्या परिसरातील परिसरातल्या गाड्यांची तोडफोड केली.यावेळी धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केला.दरम्यान तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील तिघांना पोलिसांनी अटक केलं आहे तर इतरांचा शोध सुरु आहे.आरोपींमध्ये अनेक जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे.