राज्यावर दुष्काळाचं संकट गडद होत असताना नागपुरातील तलावांच्या अवस्थेवर प्रश्न उपस्थित होतायत. पश्चिम नागपुरातील ऐतिहासिक पांढराबोडी तलावाची दुरवस्था झालीय.
तलावात गाळ, प्लास्टिक कचरा आणि जलपर्णी साचल्याचं चित्र आहे. एकेकाळी 27 एकरांवर पसरलेला तलाव आता केवळ 6 एकरांपर्यंत उरल्याची माहिती आहे.
तलावाचं सर्वांगीण पुनरुज्जीवन करावं, तसंच पावसाचं पाणी नैसर्गिकरीत्या तलावात येईल अशी व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.