कोरड्या दुष्काळाचा प्रभाव जाणवू नये यासाठी आतापासून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांचा वेगळे परिणाम देखील जाणवू लागला आहे. आता बोअरवेलचंच उदाहरण घेऊ. विदर्भातील अकरा पैकी पाच जिल्ह्यांत नव्या खाजगी बोअरवेल खणण्यावर बंदी घालण्यात आलीय.. जुन्या खाजगी बोअरवेलची खोली वाढविण्यावर देखील बंदी घातली गेली आहे. पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी हुकूम जारी केला असून अन्य जिल्ह्यात देखील अशीच बंदी लागू होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील साडे तीनशे बोअरवेल कंत्राटदारांच्या समोर अनिश्चिततेचे संकट उभे ठाकले आहे. नेमके कशा पद्धतीचे दैनंदिन आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे आणि तोडगा म्हणून बोअरवेल बंदीला त्यांनी एक नवा पर्याय महसूल मंत्र्यांना सुचविला आहे. कोणता आहे तो पर्याय, पाहूया..
Nagpur | Borewell contractors receive calls at odd hours; demand for borewells surges as drought looms.