नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष सोडून अपक्ष पॅनल लढवणाऱ्या उमेदवारांपुढे आता वेगवेगळे चिन्ह मिळाल्याने नवं आव्हान उभं राहिलं आहे. एकाच प्रभागात चार उमेदवार असल्याने सर्वांना एकच चिन्ह मिळालेले नाही. त्यामुळे चारही उमेदवारांसाठी प्रचार करणे हे नवं आव्हान बनलं आहे. काँग्रेसच्या नेत्या तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे यांची मुलगी पूजा मानमोडे हिने भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांसह प्रभाग क्रमांक ३१ मध्ये चार जणांचं अपक्ष पॅनल उभे केले आहे. मात्र या पॅनलला एकच निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.