Nalasopara| हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या Arif Shaikh प्रकरणी मोठी अपडेट, जाणून घ्या

नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आऱोपी आरिफ शेखचे संतापजनक प्रताप समोर आलेत...त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झालेत. जीममध्ये गरब्याविषयी बोलताना आरिफनं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. याचा व्हिडीओसमोर आल्यावर पोलिसांनी आरोपी आऱिफची चौकशी केली. त्याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांना मिळाल्याची माहिती आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये 42 ते 45 तरुणींचे 150 हून अधिक अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे मुलींचे अश्लील व्हिडीओ परदेशात विकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नालासोपारा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान कालच या आरोपीविरोधात एका तरुणीनं तक्रार दाखल केलीय. एका प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण, मारहाण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप या तरुणीं केलाय... या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून आरोपीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. Nalasopara | Major update in the case of Arif Shaikh, who made objectionable remarks about Hindu women; find out the details.

संबंधित व्हिडीओ