नालासोपारा पूर्वेतील संतोषभुवन परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. लहान भावंडांना मोठी मुलगी मारायची म्हणून डोक्यात राग गेलेल्या एका आईने मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव अंबिका प्रजापति असून, ती पाच भावंडांपैकी सर्वात मोठी होती. आरोपी महिलेचे नाव असे आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिला कुमकुम प्रजापति हिला ताब्यात घेतले असून हत्या करण्यामागील कारणाचा शोध सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.